Home क्राईम घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात  चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष नानकराम रामचंदानी (वय-३३, रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता त्याने त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएक्स २११५) ही त्याच्या घराच्या समोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आला.

दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष रामचंद यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही, अखेर रविवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईट गणेश शिरसाळे करीत आहे.


Protected Content

Play sound