Home धर्म-समाज स्त्री शक्तीचा सन्मान ही आपली संस्कृती : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

स्त्री शक्तीचा सन्मान ही आपली संस्कृती : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज


निष्कलंक धाम येथे कन्या पूजन  कार्यक्रम

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नारी शक्तीचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. नवरात्री उत्सव हा देवीचा जागर असतो. स्त्री शक्तीला आपण देवीच्या रूपात पाहिलं पाहिजे असे विचार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

सतपंथ चारिटेबल ट्रष्ट आयोजित निष्कलंक धाम वढोदे येथे कुमारिका (कन्या ) पूजन विधी करण्यात आला. यावेळी महाराजांनी परिसरातून सजून धजून आलेल्या शेकडो कुमारिकांचे चरण धुवून पुसून त्यांचे पूजन केले. त्यांना सन्मानपूर्वक स्वादिष्ट भोजन खाऊ घातले. पुरी, भाजी, खीर, पाणीपुरी, ऊसाचा ताजा रस दिला. त्यानंतर प्रत्येकीला भेटवस्तू दिल्या. व त्यांचा सन्मान केला. यावेळी एकदंत महाराज, फैजपूर येथील पांडुरंग शेठ सराफ, ऍड. संदीप भंगाळे, पत्रकार तसेच सतपंथ चारिटेबल ट्रष्टचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound