फैजपूर शहरात श्री दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गेल्या २७ वर्षापासून महाराष्ट्रभरात अश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) ते अश्विन शुद्ध दशमी( विजयादशमी )श्री दुर्गामाता दौड हा धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रम होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही फैजपूर शहरात देखील १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. श्री दुर्गा माता दौड ही पूर्णतः पारंपारिक पद्धतीचा उपक्रम असून यात ध्वनि निक्षेपकाचा वापर करण्यात येत नाही तर केवळ देव देश धर्म भक्ती गीते व घोषणा दिल्या जातात तसेच दवडीच्या पुढे महाराष्ट्र भागवत धर्माची पताका म्हणून मानाचा भगवा ध्वज ठेवण्यात येतो. श्री दुर्गा माता दौड ही राजकारण सत्ता कारण अर्थकारण विरहित असून केवळ आणि केवळ देश धर्म देव काढण्यासाठीच आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

 

श्री दुर्गा माता दौड दिवसाप्रमाणे दर्शन आणि मार्ग 

दिवस पहिला (१५ ऑक्टोबर) – भवानी माता मंदिर ते अंबिका माता मंदिर मार्ग-

दुसरा (१६ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते लक्ष्मी माता मंदिर मार्ग-

दिवस तिसरा (१७ ऑक्टोबर )- भवानी माता मंदिर ते भवानी माता मंदिर उपासना कॉलनी मार्ग-

दिवस चौथा (१८ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते बीज सनी माता मंदिर न्हावी दरवाजा मार्ग-

दिवस पाचवा (१९ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते हिंगलाज माता मंदिर सिंधी कॉलनी मार्ग-

दिवस सहावा (२० ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते हरसिद्धी माता मंदिर तूप बाजार मार्ग- बाजार.

दिवस सातवा (२१ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते मरी माता मंदिर बाहेर पेठ मार्ग-

दिवस आठवा (२२ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते हिंगलाज माता मंदिर रंगार घाटी मार्ग-

दिवस नववा (२३ ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते शिवमुद्रा दुर्गोत्सव मित्र मंडळ शिवाजीनगर मार्ग

दिवस दहावा (२४ऑक्टोबर)- भवानी माता मंदिर ते कालिंका माता मंदिर कासार गल्ली मार्ग

 

Protected Content