Home क्राईम वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

0
48


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद ते वडगाव रोडवरील नवीन पाण्याच्या टाकीजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले आहे. या दोन्ही वाहनाचे चालक वाहन सोडून पसार झाले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चोपडा तालुक्यातील अडावद ते वडगाव रस्त्यावर असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशपुरी बुवा यांना मिळाली.त्यानुसार त्यांच्या पथकाने रविवारी १५ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ६९७३) आणि ट्रक्टर क्रमांक (एमएच १९ डीव्ही ३२८६) या दोन्ही वाहन जप्त केले.

दरम्यान पोलीसांनी पाहून ट्रॅक्टर चालक मंगल उर्फ ढेऱ्या युवराज कोळी आणि योगेश उर्फ गोल अनिल पाटील दोघे रा. अडावद ता.चोपडा हे दोघे चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे. याप्रकरणी पोहेकॉ सतिष भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मंगल उर्फ ढेऱ्या युवराज कोळी आणि योगेश उर्फ गोल अनिल पाटील दोघे रा. अडावद ता.चोपडा यांच्याविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल तायडे करीत आहे.


Protected Content

Play sound