कारण नसतांना विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील आंनद नगरातील माहेर आलेल्या विवाहितेला कारण नसतांना शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील आनंद नगरातील माहेर असलेल्या निसर्गा अक्षय त्रिभूवन (वय-२९) यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर येथील अक्षय सुनिल त्रिभूवन यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विवाहितेला काहीही कारण नसतांना त्रास देणे सुरू केले आहे. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली.

विवाहितेच्या आईला देखील शिवीगाळ करून त्रास दिला. शिवाय सासू,सासरे, दिर, आते सासु व इतरांना मानसिक त्रास देवून छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली.

त्यानुसार पती अक्षय सुनिल त्रिभूवन, सासू संगिता सुनिल त्रिभूवन, सासरे सुनिल रामचंद्र त्रिभूवन, दिर प्रतिक सुनिल त्रिभूवन,  आते सासू कविता जोसेफ उर्फ बंडून अंगरे, माम सासरे बंडून अंगारे, आते बहिण मिशेल बंडून अंगरे सर्व रा. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ तेजस पारीसकर करीत आहे.

 

Protected Content