जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज येथील पार्कींग झोनमधून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत मुरलीधर गिरी राजन (वय-२४) रा. साकेगाव ता.नेवासे जि.अहमदनगर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हेमंत राजन जळगाव शहरात वास्तव्याला आहे. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी (एमएच १६ सीएल ६२५४) ने जळगाव भुसावळ रोडवरील डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजात दुचाकीने आलेला होता.त्यावेळी त्याने दुचाकी कॉलेजच्या पार्कींगच्या आवारात लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यानंतर दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेमंत राजन याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी साडेसात वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.