जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवासेनेतर्फेजी. एच. रायसोनी महाविद्यालयात येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय कुमार गट बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या मुख्य फलकाचे अनावरण युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे, आशिष पाटील, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, पियुष हसवाल, राहूल चव्हाण, मनोज चव्हाण, तेजस श्रीश्रीमाळ, हर्षल मुंडे, संदिप सुर्यवंशी, प्रशांत वाणी, दिपक नेटके आदि उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडू, कुमार गट अंतर्गत मुले व मुलींच्या संघांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी केले आहे.