Home क्राईम हनुमान मंदीराजवळून तरूणाची दुचाकी लांबविली

हनुमान मंदीराजवळून तरूणाची दुचाकी लांबविली


भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील श्रीराम नगरातील हनुमान मंदिराजवळ पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, स्वप्निल संजय फेगडे (वय-३०) रा.श्रीराम नगर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सरकारी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी ७ ऑक्टोबर सकाळी १० ते ११.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ डीडब्ल्यू ९६८०) ही घरासमोर पार्किंग लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्निल फेगडे यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही, अखेर रविवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज्ञाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.


Protected Content

Play sound