Home प्रशासन नगरपालिका जिल्हाधिकार्‍यांनी केली भडगावच्या घनकचरा प्रकल्पाची पाहणी

जिल्हाधिकार्‍यांनी केली भडगावच्या घनकचरा प्रकल्पाची पाहणी

0
147


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाची पाहणी करून प्रशासनाचे कौतुक केले.

भडगाव नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पामध्ये सुका कचर्‍याचे विविध प्रकारात केलेले वर्गीकरण व ओल्या कचर्‍यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. तसेत याप्रसंगी त्यांनी ऑक्सिजन पार्क येथे लावण्यात आलेल्या आमराई, फणसबाग, फळबागांची व मिया वाकी पद्धतीने वृक्षलागवडची पाहणी केली. घनदाट पद्धतीने लावण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाची पाहणी करून जिल्हाधिकारी यांनी छोटेखानी जंगलात आल्याचा भास होतो असे सांगून हा प्रकल्प नक्कीच जिल्ह्याला आदर्श ठरेल असे म्हणत भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे व सर्व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी याचे हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हाधिकारी हे भडगाव येथे पंचायत समिती अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमाला आले होते. अचानक त्यांनी या प्रकल्पांना भेट दिली. याप्रसंगी भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, तहसीलदार मुकेश हिवाळे, तसेच भडगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound