Home क्राईम संतापाच्या भरात तरूणाने घेतली विहिरीत उडी

संतापाच्या भरात तरूणाने घेतली विहिरीत उडी

0
53


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा गावातील अविवाहीत तरुणाची संतापाच्या भरात शेतातील विहिरीत उडी घेवून एका शेतमजूर तरूणाची आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, दुर्गस संतोष किनगे (वय-२३) रा.चितोडा ता.यावल या तरूणाने २८ सप्टेंबर गुरूवार रोजी वाजेच्या सुमारास यावल शिवारातील देविदास तुकाराम काम पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची खबर यावल पोलीस ठाण्यात गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांनी दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयत तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे आणी वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी केले .


Protected Content

Play sound