Home Cities जामनेर जामनेर येथील दोन मंडळांच्या गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन

जामनेर येथील दोन मंडळांच्या गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन

0
39

 

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस आगारासह रूबी हॉस्पीटलमधील श्री गणेशाचे आज पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.जामनेर शहरातील जामनेर एस. टी. बस आगार गणेश मित्र मंडळ ची गणरायाची एसटी बस स्थानकात आधार प्रमुख धनराळे यांच्या हस्ते आरती व पूजन करून गणरायाची विसर्जन मिरवणूक करण्यात आली. यावेळी डीजेच्या तालावर एसटी आगाराचे वाहक चालक व कर्मचारी यांनी नृत्य करून आपल्या आवडत्या गणरायाला निरोप दिला.

त्याचबरोबर शहरातील रुबी स्टार रुग्णालयात मधील बसवण्यात आलेल्या गणरायाला जीएम नर्सिंगच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी डीजेच्या तालावर थीरकत गणरायाची मिरवणूक काढली व गणरायाला निरोप दिला. यावेळी डॉक्टर विश्वनाथ चव्हाण यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound