पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विचखेडा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे होणार्या त्रासाला कंटाळून रास्ता रोको केला. याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकार्यांची कान उघडणी केल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबतचे वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या कामामुळे नागरीक प्रचंड हैराण झाले आहेत. गावाला सर्विस रोड नाही, गावात येण्यासाठी पलीकडच्या बाजुने रस्ता नाही, जुना पुल जमीनदोस्त केल्यानंतर नदीचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही. यामुळे सर्व ग्रामस्थांना दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातच अजुन काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे जुन्या पुलाचा अपुर्ण कामामुळे नदी पात्रातील पाणी तसेच साचुन बर्याच नागरीकांच्या घरात पाणी शिरून खुप मोठे नुकसान झाले, या पाण्यामुळे अनेक पशुधनधारकांचा पशुधनाचा देखील मृत्यू झाला.
या रोजच्याच दैनंदिन त्रासाला कंटाळुन शुक्रवारी विचखेडा येथील विजय निकम, मा. सरपंच अशोक महाजन, सरपंच रवींद्र पानपाटील, उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित पवार, सदस्य आसाराम गायकवाड , वि.का.सो चेअरमन राजाराम माळी, संचालक बंडू गिरधर पाटील, संचालक समाधान पाटील, संचालक पप्पू गढरी, संचालक प्रकाश चौधरी, संचालक दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, संचालक निळकंठ पाटील, संचालक डॉ भैय्यासाहेब माळी, संचालक इच्छाराम चौधरी, संचालक रमेश पाटील यांचेसह संतत्प नागरीकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी भेट दिली असता संतप्त आंदोलकांनी दैनंदिन उद्भवणार्या समस्यांचा पाढाच वाचला. या समस्यांचा आधारे आमदार चिमणराव पाटील यांनी महामार्गाच्या उपस्थित अधिकार्यांची चांगलीच कानऊघाडणी केली. तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास उद्भवणार्या परिस्थितीला महामार्ग प्रशासन जबाबदार असल्याचा सुचना देखील यावेळी केल्या. तद्नंतर उपस्थित अधिकार्यांनी सर्विस रोड, गावात येण्यासाठी व्यवस्था व अपुर्ण अवस्थेत सोडलेल्या जुन्या पुलाचे काम तातडीने पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले व आमदार चिमणराव पाटील यांनी मध्यस्थी करत हा रास्ता रोको मिटवण्यात आला.
या प्रसंगी शोएब दादा, शंकर चौधरी, रवींद्र शिंपी, भूषण चौधरी, गजानन पाटील, विठ्ठल पाटील, रामराव पाटील, सर्जेराव पाटील, पंडित फकीरा पाटील, शरद पाटील, दीपक सुनील पाटील, मोहित पाटील, संदीप सर्जेराव पाटील, सतिलाल तुकाराम पाटील, योगेश रामकृष्ण पाटील, मुरलीधर माळी, योगेश माळी, वना माळी, निलेश भिकन पाटील, आबा माळी पारोळा, अनिल वडार, राजेंद्र न्हावी, विलास न्हावी, आकाश न्हावी, भिकन कोळी, रावण कोळी, ऋषिकेश कोळी, दलाल भिल, संजय सुभान भिल, संजय मालचे, विजय महाले, दादा नेतकर, रामजी सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी, विकी बडगुजर, गोपाल बडगुजर, प्रवीण बडगुजर, मधुकर कोळी, गणेश आधार माळी, मंगेश कोळी, मंगेश माळी, सुरेश शिंपी, गोविंदा माळी, रामराव पाटील, राजेंद्र रामचंद्र पाटील यांचेसह इतरांनी आंदोलनात भाग घेतला.