भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरातील ताज नगर बोर्डाजवळ विनापरवाना हातात धारदार चाकू घेवून फिरत असलयाच्या तरूणाला भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडूच धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात ताज नगरातील बोर्डाजवळ संशयित आरोपी शरिफ शहा सलीम शहा (वय-४०) रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हा तरूण विनापरवाना आणि बेकायदेशीरित्या हाता धारदार चाकू घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता मुस्लिम कॉलनीतून संशयित आरोपी शरिफ शहा सलीम शहा याला अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.