जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची आज पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही इंडस्ट्री लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे अडीच महिन्यांची विनामुल्य ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे, ज्यात प्रामुख्याने कोर जावा, जेडीबीसी, हयबरनेट, स्प्रिंग आणि मायएसक्यूएल असणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन माळी, साक्षी चौधरी, कोमल कोपडे, शीतल बारी, नवीन नारखेडे, मोहित जाधव, अजय पवार, भरत सुरवसे, भैरवी पाटील आणि रीना माळी शामिल आहेत.
त्यापूर्वी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे, त्यासाठी कुठल्या स्किल्स लागतात, त्या कश्याप्रकारे साध्य कराव्यात, आयटी कंपनीत इंटरव्यूची तयारी कशी करावी, रेज्युमे कसा बनवावा, सध्या भारतात आणि जगात कुठल्या आयटी क्षेत्रात जास्त वाव आणि नोकरीच्या संधी आहेत तसेच त्यांनी जावा टेक्नोलॉजीवर देखील विद्यार्थ्यांना प्रक्टिकल ट्रेनिंग दिली. ह्या सेमिनारला आयएमआरचे ८९ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ह्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आणि त्यासाठी पूर्ण मेहनत घेण्याचे मंत्र दिले. ह्या ड्राइवचे संचालन आणि सूत्रसंचालन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले. ह्यावेळी प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.