पोलीसांच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शेंदुर्णीत मराठा समाजाचा भव्य मुक मोर्चा

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीहल्ला केलाचा निषेधार्थ रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. संबंधितांवर कारवाई करा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी यावेळी केली.

सविस्तर असे की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यात  मोठ्या प्रमाणावर मराठा समाज जखमी झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी येथे रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मराठा समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. याबाबतची निवेदन पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आयोजित केलेल्या भव्य मूक मोर्चात शेंदुर्णी गावातील सर्व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व संजयदादा गरुड, डॉ.सागर गरुड व उत्तम थोरात यांनी केले.

 

Protected Content