Home Cities जामनेर जालना येथे मराठा समाजावर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

जालना येथे मराठा समाजावर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्याबाबत जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी नेते संजय गरुड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, विश्वजीत पाटील, नाना पाटील, माधव चव्हाण, गजानन गवारे, दत्ता साबळे, संतोष झाल्टे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.

 

अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण करीत असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला असून या आल्यात शंभर ते दीडशे मराठा समाज कार्यकर्ते महिला व मुले जखमी झाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध जामनेर तालुका राष्ट्रवादी पार्टी तर्फे करण्यात आला असून अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लेखी नियोजन करण्यात आली असून सरकारचा निषेध असल्याच्या प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना संजय गरुड यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound