Home क्राईम नेरी-जामनेर रस्त्यावर कारने अचानक घेतला पेट !

नेरी-जामनेर रस्त्यावर कारने अचानक घेतला पेट !

0
69
(Image Credit Source: Live Trends News )


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी ते जामनेर रोडवर आज सायंकाळी डस्टर कारने अचानक पेट घेतला. यात सुदैवाने कुणाला इजा झाली नसली तरी वाहन जळून खाक झाले आहे.

(Image Credit Source: Live Trends News )

आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नेरी- जामनेर रस्त्यावर नेरी गावांमधील पोलीस स्टेशन समोर डस्टर गाडी जामनेर कडे जात असताना अचानक डस्टर या मॉडेलच्या कारने पेट घेतला. दरम्यान गाडी पेटल्याचे लक्षात आल्यानंतर गाडीमध्ये असलेले चारही जण गाडी थांबून खाली उतरून बाजूला झाले. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून गाडी कशामुळे पेट घटली आहे याची कारण मात्र समजू शकले नाही.

दरम्यान, ही डस्टर गाडी शेख असिफ शेख अब्दुल यांच्या मालकीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या गाडीमध्ये त्यांच्यासह एक जण व दोन मुलं होती यावेळी रस्त्याच्या मधोमध गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूने रस्त्यावर वाहनांची रांग लागली. यामुळे परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्मिती झाले होते.


Protected Content

Play sound