Home Cities जामनेर विविध खात्यांच्या अधिकार्‍यांना राख्या बांधून साजरे झाले रक्षाबंधन

विविध खात्यांच्या अधिकार्‍यांना राख्या बांधून साजरे झाले रक्षाबंधन


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील  वंदन मातृभूमी प्रतिष्ठान तर्फ  विविध कार्यालयातील अधिकार्‍यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

रक्षाबंधन हे प्रेम स्नेह व सुरक्षा बंधन आहे ज्याप्रमाणे भाऊ आपल्या बहिणीला सुरक्षेचे वचन देत असतो त्याचप्रमाणे विविध अधिकारी काम करत असताना सर्वसामान्य जनतेचा सुरक्षा व समस्या सोडवण्याचा वचन देतात.

त्याची कृतज्ञता म्हणून जामनेर येथील वंदन मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे सगळ्या वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरा करत जामनेर शहरातील तहसीलदार पोलीस निरीक्षक डॉक्टर विविध कार्यालयातील अधिकारी यांना राखी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी वंदना मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबाबत परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound