सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रुग्णांना फळे वाटप

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील सतपंथ मंदिर संस्थांचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरिजी  महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 

येथील सतपंथ मंदिर संस्थांचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरिजी  महाराज यांच्या वाढदिवसाला लोकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे श्री आशिर्वाद हॉस्पिटल व श्री गजानन हॉस्पिटल येथे सर्व रुग्णांना डाळिंब, सफरचंद, केळी, मोसंबी, पेरू आदी  फळांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी श्री आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. शैलेश खाचणे, श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ.अभिजीत सरोदे, डॉ. एकता सरोदे, अमित सरोदे यांचेसह  सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी संजय किसन महाजन चिनावल , गणेश (केवल) महाजन खडका, अनिल पाटील विटवा, हेमंत झोपे जळगाव, प्रदीप पाटील, अशोक मुखी नारखेडे फैजपूर,  प्रा. उमाकांत पाटील यांचेसह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

 

परमपूज्य महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त आपल्या हॉस्पिटलमध्ये  फळ वाटप केल्याने डॉक्टरांनी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद दिलेत. यामुळे  रुग्णांच्या चेहर्‍यावरही हास्य उमटले. आपले इतरांनी अनुकरण करावे यासाठी प. पू. जनार्दन हरीजी  महाराजांनी आपला वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने रक्तदान शिबिर व फळ वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

Protected Content