यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभाग व यावल तहसील कार्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने महाविद्यालयात मतदार नाव नोंदणी व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फैजपूरचे प्रांत अधिकारी कैलास कडलक होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यावल तालुका तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व निवडणुक निर्णय नायब तहसीलदार रशीद तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक फैजपूरचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी मतदार नाव नोंदणी व जनजागृती याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. भारतातील लोकप्रतिनिधी हे जनतेच्या मतदानातून निवडले जातात, मतदान करणे हे १८वर्षा वरील व्यक्तीचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कैलास कडलग यांनी केले.
त्यामुळे प्रथम विधानसभा मतदार संघाच्या यादीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी नागरिकांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. आज ग्राम पंचायत नगरपालिका ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या ठिकाणी मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड केली जाते. नागरिकांनी मनात भीती न बाळगता मतदान निसंकोच पणे करावे. आपण मतदार म्हणून सामील होण्यासाठी प्रथम ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरला पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन करताना भारत हा जगातील एकमेव लोकशाही प्रदान देश आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय राज्य घटनेने ‘मतदान’ हा जनतेला नैतिक अधिकार दिला आहे. त्यामुळे आपण लोकशाही बद्दल जागृत होऊन आपल्या गावागावात मतदानाविषयी जनजागृती केली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सौ. प्रतिभा रावते यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष कामडी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. सुधीर कापडे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा उपस्थित होते. डॉ. संतोष जाधव, प्रा.छात्रसिंग वसावे, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा.प्रशांत मोरे, प्रा.मिलिंद मोरे, प्रा.अर्जुन गाढे, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.रजनी इंगळे, मिलिंद बोरघडे, प्रमोद जोहरे, प्रमोद भोईटे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.