Home Cities धरणगाव शिवसेनेत ‘इनकमींग’ : टाकळीच्या युवकांचा झाला पक्षात प्रवेश !

शिवसेनेत ‘इनकमींग’ : टाकळीच्या युवकांचा झाला पक्षात प्रवेश !

0
37
( Image Credit Source : Live Trends News )


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून तालुक्यातील टाकळी येथील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

पाळधी जिल्हा परिषद गटातील टाकळी येथील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आज पाळधी येथील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला असून गुलाबभाऊंनी या सर्वांचे स्वागत केले.

याप्रसंगी निलेश लोटन पाटील.सुनील साहेबराव पाटील.चतुर रतीलाल पाटील.शहादू रामदास कोळी.प्रल्हाद पाटील.निखिल सदावर्ते.ज्ञानेस्वर अशोक पाटील.शरद पाटील.सुकलाल पाटील.महेश पाटील.विजय पाटील.जगन्नाथ पाटील.यांचा प्रवेश सोहळा झाला असून या वेळी उपस्थित मध्ये संजय माळी( संजू महाराज) सचिन पवार. नवल पारधी.अनिल माळी.महेंद्र शिंदे.किशोर राघो पाटील.युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असून शिवसेनेची स्थिती मजबूत झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.


Protected Content

Play sound