नांद्रा शिवारातून महावितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारातून महावितरण कंपनीचे आंदोलनच्या तारांची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, पाचोरा शिवारातील नांद्रा येथील इलेक्ट्रिक डीपी क्रमांक ४९६ येथे महावितरण कंपनीच्या मालकीच्या १ लाख ४७ हजार रुपये किमतीच्या विद्युत अल्युमिनियमच्या तारांची बंडल ठेवण्यात आले होते. हे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याचे उघडकीला आले. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर सागर विठ्ठल पाटील (वय-३०,रा. परदाडे) या कर्मचाऱ्याने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकुंद परदेशी करीत आहे.

Protected Content