Home क्राईम महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयताला अटक

महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयताला अटक

0
55

पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील एका भागात २३ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महिलाही घरी एकटी असताना गावात राहणारा आकाश दादाराव सोळंके हा घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केला व तसेच मारहाण केली. दरम्यान याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आकाश सोळंके याचे वडील दादाराव सोळंके यांनी शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी आकाश दादाराव सोळंके आणि त्याचे वडील दादाराव सोळंके या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.


Protected Content

Play sound