Home राजकीय रावेर तालुक्यात ठाकरे गटाची बैठक

रावेर तालुक्यात ठाकरे गटाची बैठक


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रावेर तालुक्यातील पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक घेतली असून आगामी निवडणुकीच्या रनणीती सुमारे एक तास चर्चा झाली. जनतेच्या मनातील एकनिष्ठ उमेदवार आगामी काळात ठाकरे गटाकडून देण्यात येणार आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर उपजिल्हा प्रमुख योगिराज पाटील, तालुका प्रमुख प्रविण पंडीत यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाले. यामध्ये महाविकास आघाडी झाली तर आघाडी देईल, तो उमेदवार निवडुन आणायचा आघाडी नाही झाली तर स्वबळावर निवडणुक लढवण्यासाठी तयारीला लागायचे आदेश दिले. यामध्ये संघटना बळकट करणे, यासह रावेर तालुक्यातील अनेक राजकीय विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे तालुका प्रमुख प्रविण पंडीत यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound