Home क्राईम विसनजी नगरातून लोखंडी पत्रा व पाईपाची चोरी

विसनजी नगरातून लोखंडी पत्रा व पाईपाची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विसनजी नगरातील सुर्यवंशी हॉस्पिटल समोरून शेतकऱ्याच्या मालकीच्या २६ हजार रूपये किंमतीचे लोखंडी पत्रा आणि पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संग्रामसिंह सुरेशसिंह सुर्यवंशी (वय-३८) रा. आदर्श नगर,जळगाव यांचे विसनजी नगरातील सुर्यवंशी हॉस्पिटल समोर असलेल्या जागेत त्यांच्या मालकीचे लोखंडी पाईप आणि पात्र ठेवलेला होता. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान २६ हजार रूपये किंमतीचा लोखंडी पाईप व पत्रे चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संग्रामसिंह यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound