मोठी बातमी : तहसील कार्यालयातील लाचखोर लिपीकाला रंगेहात पकडले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तक्रारदार यांचे पक्षकाराविरोधात पोलीसात दाखल गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येवून प्रकरणात आरोपीला पुढील तारीख न देखत जामिनावर मुक्त करण्याच्या मोबदल्यात अडीच हजारांची लाच स्विकारणाऱ्या चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकाला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दिपक बाबूराव जोंधळे (वय-४७) रा. शास्त्री नगर, चाळीसगाव असे अटक केलेल्या लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवाशी आहे. तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध मेहुबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मेहुणबारे  पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी लिपीक दिपक जोंधळे यांनी तक्रारदार यांच्याकडे अडीच हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. गुरूवार १० ऑगस्ट रोजी पथकाने सापळा रचत लिपीक दिपक जोंधळे याला अडीच हजाराची लाच घेतंना रंगेहात पकडले.  याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Protected Content