पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने १४.५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. संबंधीत कामांची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच विकासकामाची सुरुवात करून तातडीने विकासकामे पूर्ण केली जातील. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून सतत पाठपुरावा केल्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली आहे. यात पाचोरा तालुक्यातील १) रामा ३९ खाजोळा ते पिंप्री बु रस्ता (लांबी २.२२ कि.मी) रक्कम रु.१४९.७९ लक्ष, २) सामनेर ते गुलाबवाडी रस्ता (लांबी ४.०५ कि.मी) रक्कम रु.२३७.३७, ३) रामा लोहारी बु ते लोहारी खु वाणेगाव रस्ता (लांबी ३.०३कि.मी) रक्कम रु.२०८.९४, ४) गाळण बु ते बाळद बु रस्ता (लांबी ४.६७ कि.मी) रक्कम रु.४१७.७८, भडगाव तालुक्यातील ५) कनाशी-लोण-घुसर्डी खु रस्ता (लांबी ३.८१ कि.मी) रक्कम रु.२७७.११ लक्ष, ६) बात्सर ते नवे बात्सर रस्ता (लांबी १.९५ कि.मी) रक्कम रु. १५४.६४ लक्ष आदी गावांना एकूण १४.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.