भुसावळचे निलंबीत तलाठी नरेंद्र ठाकूर सेवेतून बडतर्फ

भुसावळ प्रतिनिधी । सध्या निलंबीत असणारे येथील तलाठी नरेंद्र राजेंद्र ठाकूर यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फे करण्यात आल्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सातारे गाव आणि भुसावळ या दोन्ही सजांमध्ये तलाठी म्हणून काम केलेले नरेंद्र राजेंद्र ठाकूर यांना गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे निलंबीत करण्यात आले होते. निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात हजेरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश दि.१२ रोजी दिले आहेत. याची प्रत नरेंद्र ठाकूर यांना देण्यात आली आहे. प्रांताधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे महसूल क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content