Home Cities धरणगाव संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

0
104


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने  मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मरकाजवळ झालेल्या आंदोलन करून  जाहीर निषेध केला.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, साईबाबा यांच्यावर टिका करीत असतांना शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारे विधान केल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर राज्यातील जनतेतून संताप व्यक्त होवू लागली आहे. महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,  युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम सोनवणे, दीपक सोनवणे, देविदास महाजन, राजेंद्र ठाकरे, प्रकाश पाटील, शरद माळी, जयदीप बापू पाटील यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound