Home क्राईम वडली गावात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी

वडली गावात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडली गावात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करून २५ हजारांची चोरी झाल्याचे रविवारी १६ जुलै रोजी सकाळी सहा वाजेला उडकीला आले आहे. विशेष म्हणजे गावातीलच एक दुचाकी चोरून त्यावर बसून चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात मध्यरात्री एकाच रात्री चोरट्यांनी चार घरांना लक्ष केले. सुरूवातील चोरट्यांनी सामनेर येथून एकाची दुचाकी चोरून वडली गावात आले. शनिवारी १५ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास माजी सरपंच नारायण पाटील याचा मुलगा किरण पाटील यांची दुचाकी घरासमोर लावलेली होती. चोरट्यांनी अधीची चोरी केलेली दुचाकी घरासमोर लावून किरण पाटील यांची दुचाकी घेवून पसार झाले. दुसऱ्या दुचाकीने गावातील राजेंद्र एकनाथ पाटील यांचे खालचे बंद घराचे कुलूप तोडून २५ हजारांची रोकड लांबविली. त्यानंतर सुधाकर तानाजी पाटील यांच्या घराचे कुलूप तोडले. परंतू घरात कापूस आढळून आला. त्यावेळी एका महिलेला जाग आल्याने तेथूनही काढता पाय घेतला आणि शेवटी भाऊसाहेब दयाराम देसले यांच्या घराचा दरवाजा तोडला त्यावेळी शेजारील राहणारे ग्रामस्थ जागे झाल्याने तेथूनही चोरट्यांना पळ काढावा लागाला. ही घटना घडल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound