अमळनेर – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील वीज उपकेंद्रात तब्बल सहा वर्षे आपली सेवा बजावल्यानंतर सहाय्यक अभियंता उमेश गोविंदा वाणी यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील पातोंडा वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता उमेश गोविंदा वाणी यांची तब्बल सहा वर्षानंतर जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील महावितरण च्या वीज केंद्रात नुकतीच बदली झाली आहे. यानिमित्ताने त्यांचा पातोंडा वीज उपकेंद्राच्या वतीने छोटा खाणी निरोप समारंभ ठेवण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी ऑपरेटर सुरेश धनगर हे तर यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण वीज कर्मचारी तसेच गावातील सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्द्ल गावकऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. येथील वीज कर्मचारी यांनी देखील सहाय्यक अभियंता उमेश वाणी यांच्यावर फुलांची उधळण केली. व निरोप दिला.