भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आखतवाडे शिवारातून डेरेदार नींबाच्या झाडांची कत्तल करुन अवैधपणे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर वन विभागाने जप्त केले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, आखतवाडे शिवारातून हिरवेगार व डेरेदार निंबाच्या झाडांची अवैध कत्तल करून आज सकाळी सात वाजता नगरदेवळा रेल्वे स्टेशन कडून भडगाव कडे विना नंबरचे दोन ट्रॅक्टर लाकडांची वाहतूक करत असताना सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी थांबवले व विचारणा केली.
यावर ट्रॅक्टर धारकांनी उडवा उडवीची उत्तर देत अवैध वाहतूक करत असल्याचे लक्षात येताच या बाबत भडगाव पाचोरा रेंजर ऑफिसर मुलाणी, वनपाल नंदू पाटिल, नाकेदर मुकेश बोरसे यांना या बाबत महिती दिली. या अनुषंगाने भडगाव पोलिस स्टेशनला हे ट्रॅक्टर जमा करा असे सांगितले. या वेळी वनपाल नंदू पाटिल यांनी ट्रॅक्टर धारकांना पास बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा पास आढळून आला नाही.
यामुळे अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन्हीही विना नंबरचे ट्रॅक्टर हे भडगाव येथील पाचोरा रोड वरिल सॉ मील व चाळीसगांव रोड वरील सॉ मील येथे जमा करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टर्सचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई साठी दोन्हीं ट्रॅक्टर जमा करण्यात आल्याची माहिती वनपाल नंदू पाटिल यांनी दिली आहे. तसेच यापुढे अवैध लाकूड तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.