Home Cities पाचोरा खेडगाव (नंदीचे) विकासोच्या चेअरमनपदी प्रकाश पाटील बिनविरोध

खेडगाव (नंदीचे) विकासोच्या चेअरमनपदी प्रकाश पाटील बिनविरोध


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) विविध कार्यकारी विकास सोसायटीची चेअरमनपदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात चेअरमन पदी प्रकाश तिरसिंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नवनियुक्त चेअरमन प्रकाश पाटील यांचा कुरंगी – बांबरुड गटाचे मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी पंढरीनाथ पाटील यांचेसह वि. का. सोसायटीचे सचिव, सर्व सदस्य उपस्थित होते. प्रकाश पाटील यांच्या बिनविरोध निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound