Home धर्म-समाज कै. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनी वृक्षारोपण

कै. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनी वृक्षारोपण

0
43


सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते तथा विचारवंत कै. मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथि चे औचित्य साधून अध्यापक विद्यालय खिरोदा येथे मान्यवरांच्या हस्ते सावखेडा रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

 

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ.अरुणाताई चौधरी , युवा नेते धनजंय  चौधरी व संजय चौधरी या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावणे हे तर महत्वाचेच पण त्याही पेक्षा त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते असे प्रतिपादन युवानेते धनंजय चौधरी यांनी केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य   डॉ. सौ.प्रतिभा बोरोले , विद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एस.तायडे व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर व छात्रध्यापक उपस्थित होते.


Protected Content

Play sound