Home Cities अमळनेर अमळनेर बाजार समितीतर्फे ना.अनिल पाटील यांचे भव्य पुष्पहार टाकून स्वागत

अमळनेर बाजार समितीतर्फे ना.अनिल पाटील यांचे भव्य पुष्पहार टाकून स्वागत

0
115

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांचे भव्य पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले.

 

येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विश्रामगृह समोरील महाराणा प्रताप चौकात क्रेनच्या सहयाने भव्य असा  गुलाबपुष्पांचा हार ना.अनिल  पाटील यांना फटाक्यांच्या आतिषाजित घालण्यात आला. यावेळी शिरपूर येथील आदिवासी मुली यांनी ना.अनिल पाटील यांचे औक्षण केले. आदिवासी बांधवांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील, समाधान धनगर, डॉ.अशोक पाटील, संचालक नितीन पाटील, प्रकाश अमृतकार, एल टी पाटील यांचेसह गट सचिव संघटना जिल्हाध्यक्ष विजय पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव पाटील,नगरसेवक विवेक पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे  आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound