यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील दिलीप पाटील यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश वामन गोसावी यांची भेट घेवून किनगाव येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांचे माध्यमिक शिक्षण किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्याप्रसारक संस्था जळगाव व्दारे संचलित नेहरू विद्यालय किनगाव येथे झाले ते दिलीप पाटील यांचे वर्गमित्र असून डाँ.सुरेश गोसावी यांच्यासोबत १९८५ ते १९८८ या कालावधीत त्यांनी सोबत किनगाव येथे शिक्षण घेतले.डाँ.सुरेश गोसावी हे मुळचे धामणगाव ता.जळगाव येथील रहिवाशी असुन त्यांचे वडील वामण गिरी गोसावी हे किनगाव येथील नेहरू विद्यालयात शिक्षक होते. व मोठे बंधु किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात वैद्यकीय आधिकारी म्हणून कार्यरत होते. ग्रामीण भागात राहुन हालाखीच्या परीस्थीतीत शिक्षण घेतले. तसेच कोणत्याही क्षेत्रातील वारसा नसतांना फक्त आपल्या कौशल्यावर पुणे सारख्या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाचे कुलगुरू झाल्याबद्दल डाँ.सुरेश गोसावी यांचे किनगावसह परीसरातुन कौतुक होत आहे. दिलीप पाटील यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.सुरेश वामन गोसावी यांनी जुन्या आठावणींना उजाळा देत सर्वांची विचारपूस केली तर दिलीप पाटील यांनी डाँ.गोसावी यांना किनगाव भेटीचे निमंत्रण दिले असता जळगाव येथे आल्यावर आपण नक्कीच आपली कर्मभुमी किनगावच्या विद्यालयाला भेट देवु असे आश्वासन ही डॉ.सुरेश गोसावी यांनी यावेळी दिले.