Home Cities अमळनेर विशाखा गणितात अव्वल; जाणून घ्या, कसा केला सराव (व्हिडीओ)

विशाखा गणितात अव्वल; जाणून घ्या, कसा केला सराव (व्हिडीओ)

0
185
vishakha
vishakha


vishakha

अमळनेर प्रतिनिधी । नुकताच दहावीचा निकाल लागला असून, त्यात अत्यंत मेहनतीने व आपल्या आई वडीलांचे स्वप्न उराशी बाळगून डि.आर. कन्या शाळेची विद्यार्थीनीं विशाखा कोठवाल हीने शाळेत 94:60 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

शाळेत अनेक विदयार्थ्यांना गणित विषयाबद्दल भिती असते. मात्र विशाखाने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण संपादन केले आहे. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने बातचीत केली असता. त्यावेळी विशाखा म्हणाली की, नियमित अभ्यास, प्रश्न-पत्रिकेचा सराव, वाचन व लेखन व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले. तसेच भविष्यात तिला इंजिनिअरिंग या क्षेत्रात जाण्याची आवड आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका जे.के. सोनवणे मँडम, गणित शिक्षक आर.सी. मोराणकर, विनोद जाधव, शर्मिला बडगुजर, अर्चना जोशी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच प्रश्न-पत्रिकेचा सराव करुन घेतला. तिच्या यशाचे अभिनंदन व भाविष्याच्या भावीवाटचालीस ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound