जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील इकबाल हॉल येथून एका व्यावसासिकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात इम्रान शेख रमजान (वय-२८) रा. मास्टर कॉलनी,जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २९ जुन रोजी इम्रान शेख याने त्याची दुचाकी (एमएच १९ सीडी ७९४४) त्याने त्याच्या घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार ३० जून रोजी सकाळी उघडकीला आला. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.