


पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लिल कृत्य करत विनयभंग करून पती व मुलाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी ४ जुलै रोजी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय महिला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता महिला ही त्यांच्या शेतात काम करत असताना संशयित आरोपी विश्वास भगतसिंग राजपूत आणि लताबाई विश्वास राजपूत या दोघांनी महिलेच्या बांधावर आले. महिला शेतात काम करीत असताना यातील संशयित आरोपी विश्वास राजपूत याने महिलेचा हात पकडून अंगलटपणा करून अश्लिल कृत्य करत विनयभंग केला. तसेच लताबाई परदेशी या महिलेने पिडीत महिलेला मारहाण करून गळ्यातील मंगलपोत तोडून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर दोघांनी तिच्या पतीला व मुलांना शिविगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.



