मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक शामराव हिरामण जावरे गुरूजी यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.

आज सायंकाळी शामराव हिरामणजी जावरे उर्फ गुरुजी ( वय ९१) यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ४ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचे राहते घर संताजी नगर मुक्ताईनगर येथून निघेल. शामराव जावरे हे श्री गंगेश झेरॉक्सचे संचालक संतोष, निलेश व मुकेश जावरे यांचे आजोबा होते.
आज गुरूपौर्णिमेच्याच गुरूजींनी शेवटचा श्वास घेतल्याची चर्चा परिसरात होत असून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे.