यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने विषारी द्रव्यसेवन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनंजय दिलीप महाजन (वय-२९) रा. दहिगाव ता. यावल असे मृत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धनंजय महाजन हा यावल तालुक्यातील दहिगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामाला होता. शनिवारी १ जुलै रोजी नायगाव रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ काहीतरी विषारी द्रव्यसेवन करून आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याला पाणी पुरवठ्यावर कार्यरत असलेले गटु पाटील हे कामानिमित्त पाण्याच्या टाकीवर गेले असता त्या ठीकाणी धंनजय दिलीप महाजन हा बेशुद्ध अवस्थेत आढळुन आला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना १ जुलै रोजी दुपार वेळी त्याला मृत्युने गाठले. मरण पावलेल्या अविवाहित तरुणावर काल रात्रीच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामपंचायत मध्ये एका वर्षापुर्वीच पाणी पुरवठ्यावर कर्मचारी म्हणून कामास लागलेल्या तरुणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही.