जामनेरात बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुका वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे तालुक्यातील बंजारा समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी श्याम चैतन्यजी महाराज, बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश नाईक, शेतकरी संघ व्हाईस चेअरमन उत्तम राठोड,  शेतकरी संघ संचालिका रजनी नाईक,  कमिटी संचालक धनराज चव्हाण, तुकडोदास नाईक, वसंतराव नाईक अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष बी डी धाडी, प्राध्यापक गजानन राठोड, अमरसिंग राठोड, इंदल जाधव, महेंद्र नाईक, बन्सी चव्हाण यांच्यासह वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

जामनेर येथील वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनातर्फे तालुक्यातील दहावी बारावी विविध परीक्षेमध्ये विशेष गुण घेऊन पास झालेल्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना जर भविष्यकाळात पुढे जायचं असेल तर वाघिणीचे दूध असलेल्या शिक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या शिक्षण देऊन पुढे स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले तर येणाऱ्या काळात नक्कीच मोठे व्हाल असे आव्हान या सन्मान सोहळा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात बोलताना दिला.

Protected Content