फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे अमिष दाखवत सहा महिन्यांपासून झज्ञलेल्या अत्याचारातून महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय आदीवासी तरूणी वास्तव्याला आहे. सहा महिन्यांपुर्वी तिची ओळख फैजपूर येथील राहणारा सर्फराज सईदखान (वय-२४) याच्याशी झाली. त्यानंतर त्याने तरूणीशी ओळख निर्माण केली. तिला लग्नाचे आमिष दाखवत मुंबई, जळगाव आणि तिच्या राहत्या घरी वेळीवेळी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संशयितांन गर्भपात करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पिडीत तरूणीने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सर्फराज सईदखान याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे करीत आहे.