व्यापाऱ्याची घरासमोरुन पाण्याची मोटर लांबविली | Live Trends News | Jalgaon City & Jalgaon District: Latest Breaking News and Updates

व्यापाऱ्याची घरासमोरुन पाण्याची मोटर लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात संत राजाराम नगरात घरासमोर लावलेली व्यापाऱ्याची ३० हजार रुपयांची पाण्याची मोटार लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २८ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत संत राजाराम नगर येथे संदीप पंजुमल मंधान वय ३६ हे वास्तव्यास आहेत. ते व्यापारी आहेत. घरात पाणी भरण्यासाठी मंधान यांनी घरासमोर मोटार लावलेली आहे. ही पाण्याची मोटार चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार २७ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास समोर आला. आजू बाजूला परिसरात पाण्याची मोटारबाबत विचारपूस तसेच चौकशी केली, मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी बुधवारी संदीप मंधान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ३० हजार रुपयांची पाण्याची मोटार लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद हे करीत आहेत.

Protected Content