उकळता चहा चेहऱ्यावर पडल्याने चिमुकला भाजला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगावातील विठ्ठल मंदीर परिसरात दोन वर्षाचा मुलाच्या चेहऱ्यावर उकळती चहा पडल्याने संपुर्ण तोंड भाजल्याची घटना शनिवारी २७ मे रोजी दुपारी घडली आहे. जखमी झालेल्या चमुकल्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  पवन दिनेश बारेला (वय-२) रा. विठ्ठल मंदीर परिसर, जुने जळगाव असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, दिनेश रमश बारेला (वय-२६) हा तरूण जुने जळगावातील विठ्ठल मंदीर परिसरात पती व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी दिनेश बारेला यांची पत्नीने चहा केली होती. चहा करत असतांना पवन हा अचानक जवळ आला. त्याचा धक्का लागल्याने उकळता चहा तोंडावर पडला. या उकळत्या चहामुळे चिमुकल्याचा चेहरा पुर्णपणे भाजला गेला. त्याला शेजारी राहणारे सोनू माधव राठोड याच्या मदतीने जखमी चिमुकल्याला रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचा प्रकृती स्थिर आहे.

Protected Content