Home Cities जळगाव अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांची शुक्रवारी आढावा बैठक

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांची शुक्रवारी आढावा बैठक


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात 596 लाभार्थ्यांना 37 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकामार्फत वाटप करण्यात आले असून या कर्जाच्या व्याजापोटी होणारी 5 कोटी 68 लाख रुपयांची सबसिडी लाभार्थींच्या खात्यात जमा झालेली आहे.

 

महामंडळच्या योजनांचा व जळगाव जिल्ह्यातील बँकांचा आढावा घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, (मंत्री दर्जा) हे 16 जुन, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. श्री. पाटील यांच्या उपस्थितीत व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी 11.30 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound