Home Cities अमळनेर अमळनेर दंगल प्रकरणी गुन्हा दाखल : संशयितांची धरपकड

अमळनेर दंगल प्रकरणी गुन्हा दाखल : संशयितांची धरपकड

0
45


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे दोन गटांमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी ६१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २९ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून शुक्रवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी दोन्ही गटांतील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २९ जणांना अटक केली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. यात तलवार हल्ल्यात एपीआय राकेशसिंग परदेशी हे जखमी झाले आहेत. तर दगडफेकीत ३ अधिकारी व ३ कर्मचारी जखमी झाले आहेत.

 

या प्रकरणी एकूण ६१ जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील २९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून इतरांचा शोध सुरू आहे. सध्या शहरातील वातावरण पूर्णपणे नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound