यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचा जाहीर निषेध नोंदवून पक्षाचा २४ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचा पक्षाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीर निषेध नोंदवला. आणि वर्धापन दिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असुन , पक्षाच्या प्रचार प्रसार आणी बळकटीला सर्वांनी अधिक प्रभावी प्रयत्न कंरावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी कार्यकर्त्यांना केले. येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रा मुकेश येवले यांचा हस्ते पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. पक्षातर्फे हे वर्ष रौप्य महोत्सवी साजरे करण्याचे असुन पक्षाला सक्षम बनविण्यासाठी सभासद नोदणी बुथ सक्षमीकरण करणे जनतेच्या हित जोपासणे,लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित करणे, जनसामान्यांसाठी कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आयोजन करणे असे उपस्थित पदधिकारी यांनी कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन व्दारे सुचना दिल्यात. तसेच याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष खा .शरद पवार यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा तिव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला व अशा प्रकारे धमकी देणाऱ्यास राज्य शासनाने तात्काळ अटक करून त्यास कडक शासन करावे अशी मागणी ही करण्यात आली .
यावेळी पक्षाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. मुकेश येवले, विजय पाटील, डी. के. पाटील , देवकांत पाटील, अन्वर खाटीक, महिलाध्यक्ष प्रतिभा नीळ, डॉ. हेमंत येवले, एम.बी. तडवी, अय्युब खान मोहसीन खान, अरूण लोखंडे, बापु जासुद, विनोद पाटील कासवे ,आबिद कच्ची, राहुल चौधरी, पितांबर महाजन, राजु करांडे, गुणवंत नीळ, भगवान बेर्डे, चंद्रकांत पाचपोळ, किशोर माळी, वसंत पाटील, समाधान पाटील, किरण पाटील, नितीन शिंदे, राकेश सोनार, ऊसमानभाई, शे. नसीर पेंटर, निलेश बेलदार आदी पक्षाचे कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते.