शाळेच्या वर्ग खोलीतून साहित्य चोरीला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विदगाव येथील वारके विद्यालयाच्या वर्ग खोलीतून १० हजार रूपये किंमतीचे एलसीडी आणि डीव्हीडी प्लेअर चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे ए.एम. वारके विद्यालय आहे. दरम्यान चोरट्यांनी शाळा बंद असल्याचा फायदा घेत शाळेतील वर्ग खोलीतून एलसीडी टीव्ही आणि डीव्हीडी प्लेयर असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र न्याहळदे यांनी ळगाव तालुका पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content