जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात कृषी विभागामार्फत बियाणे दुकानाची तपासणी बियाणे जास्तीचे दराने विकल्यास होणार कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी दिला आहे.
जामनेर प्रतिनिधी तालुक्यामध्ये खरीप हंगाम कपाशी पिकाची लागवड साठी शेतकर्यांची खत व बियाण्याच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याचा फायदा घेत बियाणे दुकानदार हे बियाण्याचे जास्तीच्या दरामध्ये विक्री करत असल्याची तक्रार आल्यानंतर जामनेर कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी जामनेर शहरातील सर्व बियाणे दुकानावर पथकाद्वारे देण्याची तपासणी करीत आहेत.
जो कोणी बनावट बियाणे व७ बियाण्याची जादा दराने विक्री करेल अशावर कायदेविषयक कारवाई होईल त्यामुळे ज्या शेतकर्यांना दुकानदाराने बियाण्याचे दर जास्तीचे घेतले असतील त्यांनी कृषी विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी केले आहे.